पेशव्यांनी मुघलांकडे वाशीमचा हा नजराणा देण्याची घातली होती अट 
विदर्भ

पेशव्यांनी मुघलांकडे वाशीमचा हा नजराणा देण्याची घातली होती अट

राम चौधरी

वाशीम : राजे- महाराजांमध्ये इतिहासात अनेक लढाया झाल्या. लढाईनंतर तह झाले. या तहांमध्ये खंडणीबरोबरच मौल्यवान वस्तूंचा समावेश असे. पेशवे व निजामात झालेल्या युद्धात पेशव्यांनी निजामाला वाशीमचे कापड तहात मागीतल्याचा उल्लेख इतिहासात आहे. 

पुरातन वत्सगुल्म, वत्सोम, बासम व आताचे वाशीम असे वाशीम शहराच्या नामांतराचे स्थित्यांतरण झाले आहे. या स्थित्यांतरामध्ये वाशीम शहराच्या ऐश्‍वर्यसंपन्न, आध्यात्मिक व व्यापारी ठेव्याची इतिहासात नोंद आहे. वाशीम शहर राजेवाकाटकांची कधीकाळी राजधानी होती. नंतर या शहरावर निजाम, भोसले, पेशवे या राजवटींनी राज्य केले. निजाम काळात तर या शहरावर या तीनही सत्तांचे राज्य होते.

दक्षिणेकडील भागावर निजामाचे राज्य, पश्‍चिमेकडील भागावर नागपूरकर भोसल्यांचे राज्य तर पूर्वेकडील भाग पेशव्यांच्या राजवटीत विभागाला गेला होता. मोगल काळामध्ये ढाक्याची मलमल संपूर्ण जगात प्रसिद्ध होती. मात्र, ढाक्याच्या मलमली पेक्षाही तलम कापड वाशीमच्या रंगारी गल्लीत विणले जात असल्याची नोंद आहे. पेशवे व निजामाच्या युद्धामध्ये निजामाचा पेशव्यांनी पराभव केला होता.

यावेळी झालेल्या तहात निजामाने पेशव्यांना 20 लाख हुणांचा मुलूख तोडून दिला होता. त्याबरोबरच पेशव्यांनी निजामाकडे 1500 वार वाशीमचे कापड नजराण्यामध्ये देण्याची अट घातली होती. याचा उल्लेख इतिहासामध्ये आहे. या युद्धामध्ये नागपूरकर भोसले हे पेशव्यांच्या बाजूने लढले होते. युद्धानंतर वाशीम शहराचा उत्तरेकडील दोन कोसाचा परिघ नागपूरकर भोसल्यांना द्यावा लागला होता. याच सिमारेषेवर भोसल्यांचे दिवाण भवानीपंत काळू यांनी भव्य बालाजीचे मंदीर व पुष्करणी बांधली आहे. या वास्तुत आजही वाशीम शहराचा इतिहास सांगत भक्कमपणे उभ्या आहेत. 

आजही आहे रंगारी गल्लीचे अस्तित्व
वाशीम शहरामध्ये ज्या ठिकाणी पेशवे काळात तलम कापड निर्मिती होत होती. ती रंगारी गल्ली आजही अस्तित्वात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 20 ते 25 वर्ष हातमागाचा व्यवसाय चालत होता. मात्र, नंतर पावरलूममुळे हे व्यवसाय बंद पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT